
पुसद: प्रतिनिधी वसीम खान
दिनांक : 22 ऑक्टोबर 2025
पोलीस स्टेशन पोफाळी, जिल्हा यवतमाळ मर्ग क्र. 26/25 कलम 194 BNSS अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातील मृतकाच्या खुनाचा अखेर उलगडा करण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
पोफळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवराव ग्यानबाव वाळके (वय 45, रा. धनज, ता. उमरखेड) हा इसम आपल्या शेतात 19 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजता ग्राम आडद, शेतशिवार मृत अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने मर्ग दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळाची पाहणी करताना मृतकाच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हत्या झाल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी तीव्र केली व गावकऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित किसन सोनबा वाळके (वय 45, रा. धनज, ता. उमरखेड) याला ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपीला पोलीस कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता, त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
अप क्र. 310/2025 कलम 103 भा.न्या.स. अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्गदर्शक अधिकारी :
मा. कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा. अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा. हनुमंत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड , मा. सतीश चवरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ
स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद व उमरखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला.
