
वणी शहरातील आमेर बिल्डर्सचा संचालक जमीर खान याला सोमवार 9 जून रोजी एमपीडीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्याला रात्री उशिरा भंडारा येथे तुरुंगात सहा महिन्यासाठी तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे.
वणी शहरातील सट्टा किंग म्हणून ओळखले जाणारे जमीर खान यांना सोमवार 9 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमार अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आली असल्याचे बोलल्या जाते. जमीर खान यांच्यावर मटका, सट्टा, जुगार, दंगल, हल्ला करणे, गुंडगिरी, मालमत्तेस नुकसान पोहचविणे असे अनेक गुन्हे वणी पोलिसात सोबतच परिसरातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफिया, व जीवनावशक वास्तूचा काळाबाजार करणारे यांच्यावर अधिनियम 1981 नुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना सदर केला होता. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाने जमीर खान यांना अटक करण्यात आली. त्यांना भंडार येथील तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थिती असताना आता बिल्डर बनला कसा
सहा वर्षापूर्वी ज्या सट्टा किंगची आई मिरची व दळण दळण्याचे काम करीत होती. आणि सहा वर्षात तिच्या मुलाने कोट्यवधीची माया जमविली हे कसे शक्य आहे. शहरात जागोजागी आता आमेर बिल्डरचे बॅनर पाहायला मिळते. आयपीएल सारख्या स्पर्धेत कोट्यवधीची उलाढाल करणारा हा जम्मू आता रडारवर आला. त्यातच मोमीनपुरा सारख्या गरीब वस्तीचा तो दादा म्हणून समोर आला. अत्यंत महागड्या वाहनातून फिरणे व आपल्या अवैध पैशाचा दिखावा करीत हा जम्मू शहरात फिरत होता. राजकारणात व अधिकारी वर्गात फक्त एका फोनवर काम होते. वणीतील एक आका त्याला या कार्यात मदत करतो. त्या आकाच्या विरोधात हा जम्मू काम करीत नसल्याची माहिती आहे.
