पुसद (प्रतिनिधी वसीम खान) : ५ जुन २०२५ रोजी पुसद शहरात ५००रु. च्या नकली नोट बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या घटनेच्या ४ दिवसांपूर्वी म्हणजे १ जुन २०२५ रोजी मानोरा पोलिसांनी आर्णी पो. स्टे. हद्दीत लहान मुलांच्या खेळनाच्या ५०० रु. च्या ७लाख रु किमतीच्या फुल टूफन नोटा देऊन त्या मोबदल्यात २लाख रु. घेऊन फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद केले. याच टोळी जवळून दरोडा टाकण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारे साहित्य जप्त करण्यात आले हे येथे उल्लेखनीय. या टोळीतील अटकेत असलेल्या पैकी ३ सदस्य पुसद तालुक्यातील रहिवासी आहेत. प्राप्त माहिती नुसार १ जुन रोजी आर्णी पो.स्टे. अंतर्गत कोलवण गावच्या हद्दीत एका बंद धाब्यासमोर ३ दुचाकी वर आलेल्या सहा व्यक्तींनी २ लाख रु. च्या मोबदल्यात ५०० रु च्या बनावट नोटा चे १४ बंडल (७ लाख रु.) मानोरा तालुक्यातील व्यक्तीला देण्याची बोलणी केली. मात्र त्या व्यक्ती ने आधीच मानोरा पोलिसांना या बाबत माहिती दिल्याने पोलिसांनी रॅकेटला रंगेहात पकडण्यासाठी संबंधित व्यक्तीला विश्वासात घेऊन सापळा रचला. आणि ठरल्या प्रमाणे वरील घटनास्थळी ६ व्यक्ती आले. पोलिसांना इशारा मिळताच रेड टाकली असता २ जण घटना स्थळावरून फरार झाले. तर ४ जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळून ७ लाख रु. च्या फुल टू फन या बनावट नोटांच्या बंडल सह मोटर सायकल, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान, चाकू लोखंडी रॉड, चटणी च्या पुड्या आदी दरोडा टाकण्यात उपयोगी पडणारे साहित्य जप्त केले. अटककरण्यात आलेल्या ४ आरोपी पैकी संतोष साहेबराव पवार, साईनाथ नामदेव सोळंके, जयदेव विजय सोळंके हे तीन आरोपी पुसद तालुक्यातील ज्योतीनगर घाटोडी येथील रहिवासी असून जुनेद खान रियाज खान पठाण हा हदगांव जि. नांदेड येथील रहिवासी आहे. अन्य २ जण फरार झाले. सहा आरोपी विरुद्ध कलम ३१८(४), ३१०(४),३१०(५) बी. एस. एन. २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मानोरा ठाणेदार प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात एपिआय प्रदीप अल्लापुरकर, पीएसआय अभिजीत बारे, विजय अजमिरे, जमादार राहुल जयसिंगकार, पोलिस शिपाई मनिष अगलदरे, शेख फिरोज यांनी कारवाई केली. त्यांना आर्णी पोलिसांचे सहकार्य मिळाले.
बनावाट नोटा प्रकरणी पुसदचे अजून 3 आरोपी झाले जेरबंद..