पुसद (प्रतिनिधी वसीम खान): आधार विभागाच्या नियमानुसार १८ वर्ष व पौढ नागरिकांसाठी नवीन आधार बनविण्या करीता तालुक्याचा ठिकाणी एकच सेंटर आणि तेही तहसील कार्यालयाच्या लोकेशनवर जी मशीन राहील त्यालाच अधिकार देण्यात आलेला आहे, परंतु पुसद तालुक्यात याचे विपरीत आहे, पुसदच्या एकही आधार सेंटरवर १८ वर्ष व पौढ नागरिकांचे ३-४ वर्षापासून नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधाच उपलब्ध नाही. पुसदचे तहसीलदार हे पुसद तालुक्यातील नागरिकांना यवतमाळ, दिग्रस किंव्हा महागाव येथे पाठवितात आणि येथील तहसीलदार त्यांना परत पाठवितात. पुसद हा एक जिल्हा दर्जाचा तालुका आहे आणि पुसद येथे १८ पौढ नागरिकांचे नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध नाही, हि बाब फार गंभीर आहे. आजच्या या डिजिटल इंडियाच्या काळात शासनाच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्डची आवश्यकता पडते. पुसद मध्ये १८ वर्ष पौढ नागरिकांचे नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे, इकडे तिकडे फिरावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. यां गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी विकास मीना हे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.