रविवार 25 मे रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वणीतील बौद्ध विहार बाबासाहेब भवन रंगनाथ नगर येथे एक मोपेड गाडीच्या डीक्कीतून 14 किलो 500 ग्राम गोमांस जप्त करण्यात आले. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रविवार सकाळी काही संघटनांना माहिती मिळाली की वणीच्या रंगनाथ नगर येथे काही इसम गोमांस विक्रीसाठी आणत आहे. त्यांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली. माहितीवरून पोलिसांनी मोपेड गाडीची डिकी तपासली असता त्यामध्ये काळ्या रंगाच्या वेगवेगळ्या सात पॉलीथीन थैली मध्ये गोवंश मासाचे तूकड्याचे वजन 14 किलो 500 ग्रॅम गोमांस किंमत अंदाजे 200 रुपये किलो प्रमाणे 2900 रुपयांचा मूद्देमाल अवैद्यरित्या मिळून आला वरून पोर्लीसांनी गोवंश मास व एक मोपेड वाहन एकूण किंमत 22900 रुपयांचा चा जप्त केले या कारवाईत आरोपी मोहम्मद anis अब्दुल रशीद कुरेशी (50) रा. मोमीनपुरा याला ताब्यात केली आहे..त्याच्यावर कलम 5,5 (क), 9,9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पशु वैद्यकिय अधिकारी मास गोवंश जातीचे आहे किंवा नाही याचे परीक्षणा करिता नमुने काढुन नेले आहे घटनेचा तपास पो.हे मारोती पाटील पोलीस स्टेशन वणी करत आहे
सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वणी याचे आदेशानुसार
पोउपनि सुदाम आसोरे,पो हे का गजानन होडगीर
पोलीस कॉन्स्टेबल वसीम,गणेश,नंदकुमार,रामेश्वर
यांनी केली