अपघातात जबाबदार अधिकाऱ्यावर होणार काय कारवाई आबिद हुसैन
वणी: 20 मे रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारस तालुक्यातील भांडेवाडा कोळसा खाणीत अपघात झाला. या अपघातात 208 डीप 14 बंकर खाली कोळशाच्या खाली दबून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेला पूर्णपणे वेकोली प्रशासन जबाबदार असल्याने त्या उपक्षेत्रीय प्रबंधकावर केव्हा कारवाई होईल याकडे वेकोली कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.20 मे रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारास शंकर राऊत (35) रा. चिखलगाव व रितिक मोहितकर (27) रा. चिखलगाव हे दोघे डीप 14 बंकर खाली कोळसा काढण्याचे काम करीत होते. त्यावेळी वरुण पडणारा कोळसा हा कोळसा हा रितिक याच्या अंगावर पडला तो या कोळशाखाली मानेपर्यंत दाबला. तर शंकर याच्या कमरेवर कोळसा पडल्याने तो गंभीर जखमी झाला. याचवेळी बप्पी गोरई मायनिंग सरदार व अन्य कामगार यांनी त्यांचा जीव वाचायला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी दोघांनाही वणीच्या सुगम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Box
या अपघातास पूर्णपणे वेकोली अधिकारी जबाबदारअपघातास क्षेत्रीय प्रबंधक व खान प्रबंधक जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भांडेवाडा खाणीत एकूण 754 कर्मचारी आहेत. रोजचे उत्पादन 60 ते 70 टन इतके आहे. हे उत्पादन करताना बारुदचा उपयोग केल्या जात नाही. या खाणीत 50 ते 60 कर्मचारी असे आहेत जे फक्त हजेरी लावून घरी जातात. रोज सरफेस मध्ये काम दिल्या जात आहे. आणि हे काम 6 महिन्यापूर्वी लागलेल्या ज्यांना अनुभव नाही अशा कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहे. हे काम सरफेस मध्ये कोणत्या नियमाने दिल्या जात आहे. तसेच लाईनमन हेल्पर वेब्रिजवर काम करीत आहे. त्या ठिकाणी काटा बाबू का काम करीत नाही ? ओवर मेन आणि मायनिंग सरदार ओटीच्या नावावर हजेरी देत आहे. अतिरिक्त पगार घरबसल्या भेटत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून डीजीचा रस्ता बंद आहे. या खाणीत भूमिगत कोळसा हा दूर असल्याने खर्च अधिक होत आहे मात्र उत्पादन कमी आहे. ज्यामुळे सरकारला कंपनी नुकसानीत असल्याचे स्पष्ट आहे. खान सुरक्षा महानिर्देशक यांच्याकडून ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन होत नसल्याने हा अपघात झाल्याचे म्हणता येईल. सोबतच उपक्षेत्रीय प्रबंधक यांचे पूर्ण लक्ष फक्त घोन्सा ओपन कास्ट खाणीत लागले आहे. कारण तेथून रोडसेल सुरू आहे. यामध्ये निघणाऱ्या मालावर या अधिकाऱ्याचे लक्ष लागले आहे. व भांडेवाडा खाणीत त्यांचे लक्ष नसल्याने मजुरांचे जीव जात आहे. वेळीच मदत आली नसती तर या दोन्ही मजुरांना आपला जीव गमवावा लागला असता हे तितकेच सत्य आहे.