बुलेटची फाटफाट बंद! पुसद पोलिसांनी सायलेन्सरवर चढवला रोलर
पुसद( प्रतिनिधी वसीम खान): शहरातील उपजिल्हा वाहतूक उपशाखेच्या पोलिसांनी जप्त केलेल्या५० बुलेटच्या सायलेन्सर एका रांगेत ठेवुन रोडरोलर चढविला असल्याने बुलेट स्वराचे धाबे दणाणले असून आता बुलेटची फाटफाट बंद होणार आहे.ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा वाहतूक उपशाखा पुसद पोलीसांनी पावले उचलले असून रॉयल इनफिल्ड कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तर या सगळ्या गाड्यांचे सायलेन्सर आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात५० गाड्याचे सायलेन्सर एका रांगेत ठेवुन रोडरोलर चढवून पोलिसांकडून नष्ट करण्यात आले आहेत.
त्यामुळे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वराचे धाबे दणाणले असून आता बुलेटची फाटफाट बंद होणार आहे.
तर पोलिसांच्या या कारवाईनंतर ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गाड्या कमी होतील अशी अपेक्षा आहे.सदरची कारवाई उपजिल्हा वाहतूक उपशाखा पुसदचे एपीआय शेंबडे पीएसआय वडते पोलिस अमलदार मारोती राठोड, संतोष गजभार,हरिदास कराळे किरण मोठे, शुभम गवई, संगीता राठोड, वनिता पवार, इशा नागापुरे, शालू देवकर, रामदास बंदुके या वाहतूक पोलिसांनी केली आहे.