पुसद (प्रतिनिधी वसीम खान) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पुसद शहर अध्यक्ष पदी येथील प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ, ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष डॉ. अकिल मेमन यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष श्रीमती वर्षाताई निकम यांनी पत्राद्वारे डॉ. अकिल मेमन यांना नियुक्ती बद्दल कळविले आहे. पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारानुसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात पक्ष बळकटीसाठीच पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या पुसद शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात येत असल्याचे पत्रात कळविले आहे. डॉ. मेमन हे राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्थापने पासून दीर्घ काळ पक्षाचे शहर अध्यक्ष होते. तसेच मागील सलग २० वर्ष ते पुसद नगर पालिकेत नगरसेवक व अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा अनुभव पक्ष वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल असा विश्वास प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती बद्दल डॉ. मेमन यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया ताई सुळे, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, पक्षाचे प्रदेश महासचिव शरद मैंद, जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांचे आभार व्यक्त करून पक्षाने दिलेल्या जबाबदारी ला प्रामाणिक पणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.