पुसद (प्रतिनिधी वसीम खान) आज दिनांक 16 मे 2025 रोजी पुसद येथील विश्रामगृह येथे आरटीओ कॅम्प सुरू होता. यादरम्यान यवतमाळ येथील अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी अचानकपणे सदर कॅम्पवर धाड टाकली. अँटी करप्शन च्या धाडीमुळे तेथील उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.ही धाड आज दिनांक 16 मे 2025 रोजीच्या संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास टाकण्यात आली. प्राथमिक सूत्रानुसार अशी माहिती मिळाली की , आरटीओ अधिकारी किंवा बाहेर बसून काम करणारे दलाल यांचे मार्फत अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात आली. आणि त्याच पार्श्वभूमीवर सदर कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी पुसद बस आगारातील एका अधिकारी व्यक्तीने पैशाची मागणी केली आणि तो सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला होता. आजच्या कारवाईमध्ये अधिकारी सहभागी आहे की बाहेर बसणारा दलाल व्यक्ती.. हे अजून स्पष्ट झाले नाही. परंतु या कारवाईच्या माध्यमातून मोठे घबाड बाहेर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.