ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करत स्थानिक लोकांमद्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, परिसरातील इतर दुकानांनीही अशीच अडथळा निर्माण करणारी कुंपणे केली असतानाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
ममता बेकरी हा अजहर खान सलीम खान यांचा कारखाना असून तो प्रभात कॉलनीतील मुख्य रस्त्यालगत आहे. या रस्त्यावर रहदारी कमी असून, बेकरीसमोर झाडे लावून त्यांना जनावरांपासून वाचवण्यासाठी कुंपण घालण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायतीने बिन तारखेची नोटीस पाठवून ७ दिवसांच्या आत हे कुंपण हटवण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे, या नोटीसीवर कोणतीही दिनांक नमूद केलेली नाही.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, बेकरीप्रमाणेच इतर दुकानदारांनीही सार्वजनिक रस्त्यावर अडथळे निर्माण केले आहेत. काहींनी आपला मालही रस्त्यावर ठेवल्याचे नेहमी दिसून येते, पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.
अझहर खान अत्ता गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत. या प्रकारामुळे परिसरात ग्रामपंचायतीच्या कामकाजावर शंका घेतली जात आहे. आता या प्रकरणात अजहर खान यांना गटविकास अधिकारी यांच्या कडून न्याय मिळतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.