पुसद (प्रतिनिधी वसीम खान) शहर हे गुन्हेगारीचे स्थळच बनले की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे पुसद शहरात मागील तीन ते चार वर्षापासून सतत खुणांच्या घटना घडत आहे प्रामुख्याने या खुणांच्या घटनेत आरोपी मात्र 23 वर्षाचे खालीलच असल्याचे दिसून येत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे,
काल दि. 09/5/25
रोजी पुसद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक यामधील विद्याधन बुक डेपो समोर पाच आरोपींनी मिळून दोन तरुणांवर चाकूने हल्ला चढविला होता यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी नामे देव दिलीप श्रीराम व नितीन तोंडल आहेत या दोघांचा काल रात्री आठ वाजता चे सुमारास शहरातील नाईक चौक येथे पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता, परंतु काही वेळाने हा वाद मिटला त्यानंतर नितीन तोंडलायत व मृतक सुमित सुरेश पवार हे तिथून निघून आले.
त्यानंतर रात्री साडेआठ वाजताचे सुमारास फिर्यादी शुभम सुरेश पवार मृतक सुमित पवार, नितीन तोंडला येतो व इतर काही तरुण नवल बाबा वाढ जवळ बोलत उभे असताना यातील पाचही आरोपी हे गाडीवर बसून त्या ठिकाणी आले व त्यांनी सुमित पवार यांच्या पाठीत चाकू खुपसवून वार केला.
यावेळी नितीन कुंडल आहेत व इतरही वाचविण्यासाठी धावले असता नितीन तुंडलायत याच्या सुद्धा पाठीत चाकूने वार करण्यात आले.
सदर घटनेमध्ये मध्यस्थी वाचविणाऱ्या तरुणांना सुद्धा इजा पोहचली आहे.
या घटनेनंतर आरोपी देव श्रीरामे याला तेथील तरुणांनी पकडून ठेवले होते, सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते व जखमींना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु यातील सुगीत पवार याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, व नितीन तोंडलायत याला उपचाराकरिता नांदेड येथे रेफर करण्यात आले. सदर घटनेनंतर आरोपी नामे देव दिलीप श्रीरामे वय 19 वर्ष रा. शिवाजी वाड पुसद 2- दर्शन दिलीप श्रीरामे वय 18 वर्षे राहणार शिवाजी वाढ पुसद 3- एक विधी संघर्ष ग्रस्त बालक राहणार तुकाराम बापू वाढ 4- प्रेम दीपक हाके वय 19 वर्षे राहणार शिवाजी वाड पुसद व 5- चारुदोष राठोड व 19 वर्षे राहणार नाईक चौक या आरोपी विरुद्ध मृतकाचा मोठा भाऊ फिर्यादी नामे शुभम सुरेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे बी एन एस चे कलम 103(1),103(2),109,118(1),351(2),351(3),189(2)189(4),191(2),191(3),190 व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.