वनी शहरातील साईनगरी येथे गुप्ता लेआउट येथे ग्राम महसूल अधिकारी सुनील उराडे यांना 25 ते 30 अवैद्य रेती आढळून आली मात्र ही रेती कोणाच्या मालकीची अजूनही अनुत्तरीत असून या रितीचा पंचनामा उराडे यांनी नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना पाठविला असून नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर हे या रेतीवर काय कारवाई करणार याकडे देखील जनतेचे लक्ष लागले आहे
एकीकडे घरकुलधारकांना रेतीसाठी वणवण भटकावे लागत आहे तर दुसरीकडे स्व मालकीच्या बांधकामाकरिता रेती सहज उपलब्ध होत आहे मात्र ही रेती जप्त करून नायब तहसीलदार हे घरकुलधारकांना रेती देणार का असा देखील प्रश्न आता जनतेमध्ये उपस्थित होऊन राहिला आहे
मनोज नवले वणी