
पुसद प्रतिनिधी वसीम खान
7 मे 2025 रोजी संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास पुसद-दिग्रस मार्गवर विटाळा गावाजवळ असलेल्या मोठ्या पुलावर एक भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात एक लालपरी एस.टी. बस, एक दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचा समावेश होता. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातात सहभागी झालेल्या वाहनांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
विटारा ब्रेझा (MH 29 BP 0096) – समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर
- होंडाई (MH 29 CB 8359) – समोरील उजव्या बाजूचा भाग फाटलेला
सुझुकी चारचाकी (MH 35 AG 0535) – वाहनावर ‘पोलीस’ नावाची पाटी असून उजव्या बाजूने नुकसान
बजाज पल्सर दुचाकी (MH 29 AH 0796) – दुचाकी पूर्णपणे वाकलेली, चालक थोडक्यात बचावला
लालपरी एस.टी. बस (MH 40 Y 5508) – किरकोळ धक्का
अपघात इतका भीषण होता की, जर एखादे वाहन पुलाच्या कडेला थोडे अधिक सरकले असते, तर ते थेट नदीत कोसळले असते, हे मोठे संकट टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर काहीच वेळात वसंत नगर पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पुलावरून वाहतूक सुरु ठेवण्यासाठी केवळ एकच मार्ग खुला असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट दिले जाईल.
