आज रोजी पोस्टेला तक्रारदार नामे 1) आकाश विशाल भोयर वय 21 वर्ष, रा. वणी व 1)आणखी एक विद्यार्थीन हे दोघे बस डेपो वणी येथून गावी जात असताना बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे 2 मोबाईल चोरून नेले, सदर बाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त होतात, डे ऑफिसर पो.हे. का/2189 पाटील व त्यांचा रायटर पो. का./1912 ललित नवघरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहिती अन्वये चोरी केलेले मोबाईल एक तासाचे आत हस्तगत करुन तक्रारदार हे विद्यार्थी असून, त्यांना महत्त्वाचे फॉर्म भरणे असल्याने वेळ नसल्या कारणाने, त्यांना पो.स्टे.ला तक्रार करावयाची नसल्याचे त्यांनी विनंती केली, त्यामुळे तक्रारदार यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांचे *2* *मोबाईल* परत करण्यात आले
तसेच पोलिसांवरती चा विश्वास
दृढ व द्विगुणी झाल्याची प्रतिक्रिया त्या 2 विद्यार्थ्यांनी व्यक्त केली
सदर कारवाई श्री गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांचे मार्गदर्शनात
पो.हे. का/2189 पाटील, पो. का./1912 ललित नवघरे पोलीस स्टेशन वणी यांनी केली