वणी शहरातील नावाजलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेतील एक मोठे गौडबंगाल उघड होण्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. या चर्चेमुळे ठेवीदारांच्या मनात धडकी भरली आहे. संस्था बंद तर होणार नाही ना? ठेविदारांचे पैसे बुडणार तर नाही ना? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ जिल्ह्यासह दुसऱ्या जिल्ह्यात देखील संस्था उघडत आहे. संस्था प्रगतीपथावर असल्याचे दाखवत अनेक पुरस्कार प्राप्त करीत आहे. परंतु या रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेने ठेवीदारांचे पैसे व्यापाऱ्यांच्या घशात घातल्याचे ऐकायला मिळत आहे. रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसून करोडो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपातून संचालक मंडळाला मोठे कमिशन मिळाल्याचे देखील चर्चा वणी शहरात आहे. वणी शहरातील तसेच शहरा बाहेर असलेल्या काही मालमत्ता वर सर्व नियम धाब्यावर बसवून करोडो रुपयांचे कर्ज या व्यापाऱ्यांना रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी दिले आहे. यासंदर्भात या कर्ज प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळावी याकरिता सहायक निबंधक कार्यालयाला माहिती अधिकारात सर्व माहिती मागण्यात आली परंतु अजून पर्यंत या कार्यालयाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही त्याचप्रमाणे शहरातील एका मालमत्तेवर सर्व नियम धाब्यावर बसवून करोडो रुपयांचे कर्ज देण्यात आले या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी याकरिता वणी पोलीस स्टेशन येथे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे सध्या ही तक्रार चौकशीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेचे भ्रष्टाचार उघड होत आहे आणि संचालक मंडळांना अटक करण्यात येत आहे असाच प्रकार वणी शहरातही घडणार का अशी चर्चा संपूर्ण वणी शहरात होत आहे आता या तक्रारीवर काय चौकशी होणार याकडे सर्व वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे. आणि ठेवीदार असलेल्यांच्या मनात धडकी भरली आहे.*रंगनाथ स्वामी पतसंस्थेतील मोठे गौडबंगाल होणार उघड*?
*एक रंगनाथ संस्था बंद तर दुसरी बंद होण्याच्या मार्गावर*?
वणी शहरातील नावाजलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेतील एक मोठे गौडबंगाल उघड होण्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. या चर्चेमुळे ठेवीदारांच्या मनात धडकी भरली आहे. संस्था बंद तर होणार नाही ना? ठेविदारांचे पैसे बुडणार तर नाही ना? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ जिल्ह्यासह दुसऱ्या जिल्ह्यात देखील संस्था उघडत आहे. संस्था प्रगतीपथावर असल्याचे दाखवत अनेक पुरस्कार प्राप्त करीत आहे. परंतु या रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेने ठेवीदारांचे पैसे व्यापाऱ्यांच्या घशात घातल्याचे ऐकायला मिळत आहे. रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसून करोडो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपातून संचालक मंडळाला मोठे कमिशन मिळाल्याचे देखील चर्चा वणी शहरात आहे. वणी शहरातील तसेच शहरा बाहेर असलेल्या काही मालमत्ता वर सर्व नियम धाब्यावर बसवून करोडो रुपयांचे कर्ज या व्यापाऱ्यांना रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी दिले आहे. यासंदर्भात या कर्ज प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळावी याकरिता सहायक निबंधक कार्यालयाला माहिती अधिकारात सर्व माहिती मागण्यात आली परंतु अजून पर्यंत या कार्यालयाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही त्याचप्रमाणे शहरातील एका मालमत्तेवर सर्व नियम धाब्यावर बसवून करोडो रुपयांचे कर्ज देण्यात आले या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी याकरिता वणी पोलीस स्टेशन येथे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे सध्या ही तक्रार चौकशीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेचे भ्रष्टाचार उघड होत आहे आणि संचालक मंडळांना अटक करण्यात येत आहे असाच प्रकार वणी शहरातही घडणार का अशी चर्चा संपूर्ण वणी शहरात होत आहे आता या तक्रारीवर काय चौकशी होणार याकडे सर्व वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे. आणि ठेवीदार असलेल्यांच्या मनात धडकी भरली आहे.